आर्य चाणक्यच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली इस्रोची सहल

Foto
पैठण, (प्रतिनिधी) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित आर्य चाणक्य विद्यामंदिर येथील मुलांनी भारत सरकारच्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) च्या विज्ञान प्रसार व जनजागृती उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या लॅब ऑन व्हील्स, स्पेस ऑन व्हील्स इस्रो या विशेष उपक्रम अनुभवला.

या उपक्रमाअंतर्गत इयत्ता ५ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञान, रॉकेट विज्ञान, उपग्रह तंत्रज्ञान, अवकाश संशोधन आणि आधुनिक वैज्ञानिक संकल्पना यांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेली स्पेस ऑन व्हील्स व्हॅनचे विशेष आकर्षण व कुतूहल मुलांना होते.

 विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक मॉडेल्स, प्रात्यक्षिके आणि दृकश्राव्य माध्यमातून अवकाश विज्ञानाची माहिती देण्यात आली. या प्रसंगी विविध शास्त्रज्ञानाच्या वेशभूषेत चिमुकल्यांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड, जिज्ञासा आणि नवोन्मेषी विचारसरणी विकसित करण्यासाठी ही सहल नक्कीच फायद्याची ठरणार आहे. 

सदस्य अॅड मयुरेश औटी, ज्ञानेश्वर वाडेकर, केंद्रप्रमुख रेणुकादास गर्गे, रविंद्र साळजोशी, भास्कर कुलकर्णी, केंद्रीय कार्यकारिणी तथा मुख्याध्यापक प्रा. वि., ज्योती जोशी, मुख्याध्यापक मा. वि. आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन विलास खर्डे कर आणि शिखा शाह यांनी केले.

या अनोख्या उपक्रमास डॉ. पद्मकुमार कासलीवाल (अध्यक्ष, आर्य चाणक्य शैक्षणिक संकुल), श्रीपाद कुलकर्णी विज्ञान भारती देवगिरी विज्ञान प्रतिष्ठान, मनोज चव्हाण, गटशिक्षणाधिकारी पं. स पैठण, प्रा. धारूरकर,
इस्त्रोच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाची प्रत्यक्ष ओळख होऊन भविष्यात विज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळणार आहे. 
- मनोज शिंगारे, विज्ञान शिक्षक आर्य चाणक्य विद्यामंदिर, पैठण